Aaditya Thackeray : माझ्या सुरक्षेसाठी शिवसैनिकच पुरेसे; आदित्य ठाकरे | पुढारी

Aaditya Thackeray : माझ्या सुरक्षेसाठी शिवसैनिकच पुरेसे; आदित्य ठाकरे

रत्नागिरी; पुढारी ऑनलाईन: आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. आज ते रत्नागिरी येथे जाताना त्यांच्याकडील शासकीय वाहन आणि सुरक्षा काढून घेण्यात आली. त्यांना खासगी गाड्या देण्यात आल्या. सरकारच्या या कृतीवर बोलताना, माझ्या सुरक्षेपेक्षा येथील लोकांचे प्रश्न समजून घेणे आणि त्याच्या भावना जाणून घेणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. माझ्या सुरक्षेसाठी येथील 0शिवसैनिक पुरेसे असल्याचे मतही शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.

आदित्य ठाकरे यांना झेड दर्जाची सुरक्षा आहे. पण त्यांच्या सुरक्षाकवचामधील शासकीय गाड्या काढून घेत त्याठीकाणी खासगी गाड्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेमध्ये तडजोड कुणी केली असा प्रश्न शिवसैनिक आणि रत्नागिरातील नागरिकांकडून उपस्थित  केला जात आहे.

यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ते म्हणाले सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे, पण माझ्यासाठी ते हे करत असतील तर माझ्यासाठी शिवसैनिकच पुरेसे असल्याची  प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले, माझ्यासाठी फॉक्सकॉन प्रकल्प महत्त्वाचा होता. तसेच तरूणांच्या रोजगारांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. रिफायनरी प्रकल्प हा महत्वाचा प्रकल्प असला तरी, येथील लोकभावना म्हत्वाची आहे. रिफायनरीबाबत दोन्ही बाजू आम्ही समजून घेऊ, तसेच कोणत्याही परिस्थितीत आम्ही स्थिनिकांसोबत असल्याचेही ते म्हणाले.

आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा हा रत्नागिरीत सुरू झाला आहे. त्यामुळे ते रत्नागिरीत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी येथील रिफायनरीसंबंधात येथील स्थानिकांशी संवाद साधत, त्यांची बाजू समजून घेतली. यानंतर ते चिपळूणमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार असल्याचेही समजत आहे.

Back to top button