

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : रेल्वे स्थानकांमध्ये पुन्हा एकदा बाटली बंद रेलनीर पाण्याचा तुटवडा
निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना इतर कंपन्याचे बाटली बंद पाणी जादा पैसे मोजून घ्यावे लागत आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. आईआरसीटीसीने अंबरनाथ येथे रेलनीरचा प्लांट लावल्यानंतर मध्य रेल्वेच्या भुसावल आणि पश्चिम रेल्वेवरील सूरतपर्यंत सर्व स्टॉल्समध्ये रेलनीर विकणे अनिवार्य आहे. परंतु
गेल्या काही महिन्यापासून रेलनीर पाण्याची कमतरता भासत आहे. 9 सप्टेंबर रोजी मध्य रेल्वेच्या कमर्शियल विभागाने सर्व कॅटरिंग आणि स्टॉल्सधारकांना 30 सप्टेंबर पर्यंत दुसर्या कंपनीचे पिण्याचे बाटली बंद पाणी विकण्याची परवानगी दिली आहे. अंबरनाथ येथील प्लांटमध्ये गेल्या काही दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने उत्पादन
घटले आहे.
रेल्वे स्थानकातील वॉटर वेंडिंग मशीन बंद असल्याने प्रवाशांना दुहेरी त्रास सहन करावा लागत आहे. पूर्वी अर्धा लीटरची बाटली स्थानकात सहज मिळायची परंतु रेलनीर सुरु झाल्यापासून अर्धा लीटरची बाटली मिळत नाही. त्यामुळे एक लिटरची पाण्याची बाटली विकत घ्यावी लागते.