मुंबई विमानतळावर तब्बल साडेपाच कोटींची 12 किलोची सोन्याची बिस्किटे जप्त!

मुंबई विमानतळावर तब्बल साडेपाच कोटींची 12 किलोची सोन्याची बिस्किटे जप्त!

पुढारी ऑनलाइन डेस्क : मुंबई विमानतळावर एका विदेशी नागरिकाकडून तब्बल साडेपाच कोटींची 12 किलोची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावर कस्टमच्या अधिका-यांनी ही कारवाई केली आहे. या विदेशी नागरिकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता हा प्रयत्न अधिका-यांनी हाणून पाडला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी, मुंबई विमानतळ कस्टमच्या अधिकाऱ्यांनी सुदानी प्रवाशाने घातलेल्या खास डिझाईन केलेल्या बेल्टमधून 5.38 कोटी रुपये किमतीचे 12 किलो सोने जप्त केले.

ही कारवाई सुरू असताना काही प्रवाशांनी त्याला पळून जाण्यास मदत करण्यासाठी गोंधळ घातला. परंतु अधिका-यांनी कुशलपूर्वक हा प्रयत्न मोडून काढला. अधिका-यांनी 6 पॅक्स ताब्यात घेतले आहेत आणि 6 हद्दपार केले जात आहेत, अशी माहिती कस्टमच्या अधिका-यांकडून देण्यात आली आहे.

अधिका-यांनी सांगितल्याप्रमाणे या व्यक्तिच्या खास डिझाईन केलेल्या बेल्टमध्ये 1 नव्हे दोन नव्हे तर एकूण 12 सोन्याची बिस्किटे सापडली. हे प्रत्येक बिस्किट एक किलोग्रामचे आहे. ही सर्व बिस्किटे कस्टम अधिका-यांनी जप्त केली आहेत. मुंबई विमानतळावर कस्टम विभागाची ही मोठी कारवाई मानली जात आहे. पुढील तपास सुरू आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news