कर्नाटकहून मुंबईत जाणारा ७३ लाखांचा गुटखा आळेफाटा पोलिसांनी पकडला | पुढारी

कर्नाटकहून मुंबईत जाणारा ७३ लाखांचा गुटखा आळेफाटा पोलिसांनी पकडला

आळेफाटा, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा अवैधरित्या कर्नाटकधून मुंबईत आयात केला जात असल्याची माहिती मिळताच सुसाट धावणाऱ्या गुटख्याने भरलेल्या ट्रकला पोलिसांनी आळेफाटा चौकात मोठ्या धाडसाने पकडले. या कारवाईत तब्बल ७३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी मध्यरात्री आळेफाटा पोलिसांनी केली. आळेफाटा पोलिसांनी या कारवाईत सरफराज फकीर पाशा खतिब (वय ३५, रा. दुबालगुडी, ता. हुमनाबाद, जि. बिदर, राज्य कर्नाटक) अशी अटक केलेल्या आरोपीची नाव आहे.

याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस हवालदार उमेश भगत यांना गोपनीय बातमीदारामार्फात माहिती मिळाली की, केए ३२ सी ४७८६ या ट्रकमध्ये अवैध गुटखा वाहतूक होणार आहे. याबाबत भगत यांनी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना माहिती दिली. आळेफाटा चौकात सापळा लावला असता सबंधित वाहन थांबून चौकशी करण्यात आली. अधिकची चौकशी केली असता ट्रक चालकाने समाधानकारक उत्तरे दिली नाही. वाहन पोलीस ठाण्याच्या आवारात लाऊन तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याचे सफेद पोते आढळून आले. पोलिसांनी ५५ लाख ८० हजार रुपयांचा गुटखा तसेच वाहतुकीसाठी वापरलेली ट्रक असा ऐकून ७२ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर करत आहे.

दरम्यान या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, फौजदार चंद्रा डुंबरे, हवालदार उमेश भगत, विनोद गायकवाड, पोपट कोकाटे, प्रवीण आढारी, महेश आनंदगावकर, विकास सोनावणे यांचा समावेश होता

Back to top button