मुख्यमंत्री शिंदे गणेश दर्शनासाठी ‘शिवतीर्थ’वर, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुख्यमंत्री शिंदे गणेश दर्शनासाठी ‘शिवतीर्थ’वर, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Published on
Updated on

पुढारी, ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या सदिच्छा भेटींचे प्रमाण वाढले असतानाच आज ( दि. १ ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे गेले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्या सोमवारच्या भेटीगाठीनंतर मंगळवारी भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. यानंतर आज मुख्यमंत्री शिंदे यांनी गणेश दर्शन घेण्यासाठी राज ठाकरेंच्या घरी भेट दिली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप नेत्‍यांनी राज ठाकरे यांच्‍या भेटी झाल्‍या हाेत्‍या, अशी चर्चा हाेती. मात्र आता मुख्‍यमंत्री शिंदेच राज ठाकरे यांच्‍या भेटीला गेल्‍याने राजकीय वर्तुळात नवीन आघाडीची चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, गणेशोत्सवानिम्मित्त सर्वांचीच भेट घेत असतो. या भेटीमध्ये कोणतीच राजकीय चर्चा झाली नाही. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news