कारशेड हा इगोचा विषय नाही, फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा | पुढारी

कारशेड हा इगोचा विषय नाही, फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा

मुंबई; पुढारी ऑनलाईन : कांजूरमधील कारशेड हा अव्यवहार्य होता. त्यामुळे पैसा व वेळ वाया गेला असता. कारशेड हा इगोचा विषय नाही, अशी टीका करत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मेट्रो ३ ला हिरवा कंदील दाखवल्यानंतर मार्चपर्यंत प्रकल्प पूर्ण झाला असता असे सांगत फडणवीसांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. आरे- सारितपूरनगर ट्रॅकवर मेट्रो ३ ची ट्रायल चाचणीचा शुभारंभ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते  करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने आरे कारशेड प्रकल्पाला हिरवा कंदील देऊनही अनेकांनी याला विरोध केला. यानंतर आरे प्रकल्प हा वादाचा मुद्दा बनला. अनेकांकडून या प्रकल्पाचे राजकारण करण्यात आले. तरीही अगदी योग्यवेळी मुख्यामंत्र्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला, याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो, असे मतही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही काम थांबवणे योग्य नाही. मेट्रो प्रकल्पाचा निर्णय मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. प्रदूषणामुळे दररोज मुंबईकरांचा जीव घुटमळतो. प्रदूषण कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा प्रकल्प होणे गरजेचे होते. मुंबईकरांच्या हिताकरिता हा निर्णय घेत प्रकल्पाला सुरूवात करण्यात आली असल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

पाहा लाईव्ह:

 

Back to top button