गोरेगाव येथे 25 वर्षांच्या प्रियकराची प्रेयसीकडून हत्या | पुढारी

गोरेगाव येथे 25 वर्षांच्या प्रियकराची प्रेयसीकडून हत्या

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : गोरेगाव येथे रमजान हबीब शेख या 25 वर्षांच्या तरुणाची त्याच्या प्रेयसीने गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर जोहरा मोहरम अल्लादिन शहा या 31 वर्षांच्या आरोपी प्रेयसीने पवई पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. तिच्याविरुद्ध आरे पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला असून रात्री उशिरा तिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

पतीनंतर प्रियकर रमजान हादेखील तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता, वारंवार बोलून तो लग्नास तयार होत नसल्याने जोहराने त्याची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ही घटना शनिवारी दुपारी दीड वाजता गोरेगाव येथील आरे कॉलनीतील पवई रोडवरील तपेश्वर मंदिराजवळील युनिट बारामध्ये घडली. जोहरा विवाहित असून तिचा पती तिच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. याच कारणावरून तो तिला शिवीगाळ करून मारहाण करीत होता, अशी माहितीही पुढे आली आहे.

Back to top button