मोहित कंबोज यांचा पुन्हा रोहित पवार यांच्यावर आरोप; ‘बोलबच्चन, गबरू जवान’ म्हणत साधला निशाणा | पुढारी

मोहित कंबोज यांचा पुन्हा रोहित पवार यांच्यावर आरोप; ‘बोलबच्चन, गबरू जवान’ म्हणत साधला निशाणा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : भाजप नेते मोहित कंबोज यांनी रविवारी एका पाठोपाठ एक ट्विट करत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला. ‘गबरू जवान’ आणि ‘बोलबच्चन’ अशी संभावना त्यांनी केली. पवार यांच्या स्टार्ट अप कंपन्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची अनियमितता असल्याचा आरोप कंबोज यांनी केला आहे.

मोहित कंबोज यांनी 22 ऑगस्ट रोजी थेट रोहित पवार यांना टॅग करत बारामती अ‍ॅग्रो लिमिटेड या कंपनीचा अभ्यास सुरू केल्याचा इशारा दिला होता. या कंपनीच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहारांचाच एका अर्थाने थेट इशारा मोहित कंबोज यांनी दिला होता. त्यानंतर रविवारी एका पाठोपाठ एक ट्विट करत रोहित पवारांवर त्यांनी निशाणा साधला. रोहित पवार संचालक असलेल्या ग्रीन एकर कंपनीच्या ईडी चौकशीचे वृत्त झळकले. यावर भाजपवर सुडाच्या राजकारणाचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला. त्याला थेट उत्तर देत कंबोज म्हणाले की, दागिने, जमिनीचे व्यवहारांपासून ते अंडर गारमेंटस्च्या व्यवसायात असलेल्या ग्रीन एकर रिसॉर्ट या स्टार्ट अप कंपनीने कोट्यवधींचे व्यवहार केले.

पत्रा चाळीत किती ‘साखर’ खाल्ली?

या गबरू जवानने पीएमसी बँक घोटाळा, एचडीआयएल आणि पत्रा चाळ प्रकरणात किती ‘साखर’ खाल्ली हे लवकरच समोर येईल, असा इशाराही कंबोज यांनी ट्विटमध्ये दिला आहे.

Back to top button