गोवा : सोनाली फोगाट यांचा खून; त्या दिवशी नेमकं काय घडलं? | पुढारी

गोवा : सोनाली फोगाट यांचा खून; त्या दिवशी नेमकं काय घडलं?

हणजूण; पुढारी वृत्तसेवा : भाजपच्या हरियाणातील नेत्या तथा टिकटॉक अभिनेत्री सोनाली फोगाट यांचा द्रवपदार्थामधून घातक रसायन (सिंथेटीक ड्रग) पाजून खून केल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले.

राजकीय कारकीर्द संपविण्यासाठी आणि मालमत्ता हडप करण्यासाठी हा खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सोनाली यांचा स्वीय सहायक सुधीर सांगवान आणि त्याचा साथीदार सुखविंदर सिंग यांनी या खुनाची कबुली दिलेली आहे. त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. ही माहिती पोलिस महानिरीक्षक ओमवीरसिंग बिश्नोई यांनी येथील पोलिस ठाण्यात शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

त्यांच्यासोबत पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन, पोलिस उपअधीक्षक जिवबा दळवी उपस्थित होते. सोनाली यांचा लैंगिक छळ झाल्याचा, बलात्कार झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी तक्रारीत केलेला आहे. यासंदर्भात बिश्नोइ ते म्हणाले, शवविच्छेदन अहवालात अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सोनाली यांच्या शरीरावर जखमा होत्या, याविषयी बिश्नोई म्हणाले, या जखमा किरकोळ होत्या. संशय येण्यासारख्या या जखमा नव्हत्या. संशयित त्यांना बाथरूममधून उठवत असताना झालेल्या या किरकोळ जखमा होत्या.

सोनाली यांचा भाऊ भाऊ रिंकू ढाका यांनी केलेल्या तक्रारीनुसार संशयितांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. घटनास्थळाची पाहणी पोलिसांनी केलेली आहे. संशयित गोव्यात जेथे जेथे गेले तेथे पोलिसांनी चौकशी केलेली आहे, असे बिश्नोई म्हणाले.

खुनात कोणाला इंटरेस्ट?

हा खून पूर्वनियोजित कट आहे, असे आपणास वाटते का? असा प्रश्न बिश्नोई यांना विचारला असता त्यांनी ही शक्यता नाकारली नाही. तर आताच सांगणे कठीण आहे. सोनाली यांचा खून करण्यात कोणाला तरी इंटरेस्ट असावा, असे विधान बिश्नोई यांनी केले.

घातक रसायन कोणते?

बिश्नोई यांनी द्रवपदार्थामधून घातक रसायन पाजल्याची माहिती दिली. घातक रसायनासाठी त्यांनी जलपेुर्ळेीी उहशाळलरश्र असा शब्द वापरला. नेमके कोणते घातक रसायन पाजले या प्रश्नावर संशयितांनी सिंथेटीक ड्रग्स वापरलेले आहे. परंतु, नाव सांगितलेले नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

बाथरूममध्ये 2 तास

कर्लिस बारमधील पार्टीचा व्हिडीओ गोव्यासह सर्वत्र दिवसभर फिरत आहे. या व्हिडीओमध्ये सोनाली यांना घेऊन संशयित बाथरूमच्या दिशेने जाताना दिसतो. यावेळी त्या अडखळत चालताना दिसतात. बाथरूममध्ये ते दोन तास का थांबले? हा प्रश्न आहे.

सीसीटीव्ही फुटेज

कर्लिस बारमध्ये सोनाली, सुखविंदर आणि सुधीर पार्टीसाठी गेलेले होते. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. या फुटेजमध्ये अनेकजण क्लबबाहेर पार्किंग करतानाही दिसलेले आहेत. आमचे तज्ज्ञ सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत, अशी माहिती बिश्नोई यांनी दिली.

Back to top button