Gold Silver Price Today : सोने, चांदी दरात घसरण, जाणून घ्या नवे दर

Gold Silver Price Today : सोने, चांदी दरात घसरण, जाणून घ्या नवे दर

पुढारी डेस्क : सराफा बाजारात आज शुक्रवारी सोने, चांदी दरात (Gold Silver Price Today) घसरण दिसून आली. आज शुद्ध सोन्याचा दर १८६ रुपयांनी कमी होऊन प्रति १० ग्रॅम ५१,९०८ रुपयांवर खुला झाला. काल गुरुवारी हा दर ५२,०९४ रुपयांवर बंद झाला होता. चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीचा प्रति किलो दर आज ५५,६९७ रुपयांवर खुला झाला.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, Gold Silver Price Today आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५१,९०८ रुपये, २३ कॅरेट ५१,७०० रुपये, २२ कॅरेट ४७,५४८ रुपये, १८ कॅरेट ३८,९३१ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर ३०,३६६ रुपयांवर होता. चांदीचा दर प्रति किलो ५५,६९७ वर आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर ऑक्टोबर डिलिव्हरी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५१,५१४ रुपये होता. जागतिक बाजारात स्पॉट गोल्ड ०.४ टक्क्यांनी घसरून प्रति औंस १,७५१ डॉलरवर आले. US सोने फ्युचर्स ०.४ टक्क्यांनी घसरून १,७६३ डॉलरवर होते. ((१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम)

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news