मुंबईत स्वाईनचे 163 रुग्ण | पुढारी

मुंबईत स्वाईनचे 163 रुग्ण

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  मुंबईत जुलैमध्ये स्वाईन फ्लूच्या 105 रुग्णांची नोंद झालेली असताना 1 ते 21 ऑगस्ट दरम्यान 163
रुग्णांची नोंद झाली आहे, तर जानेवारी ते ऑगस्ट या काळात एकूण 272 रुग्ण आढळले आहेत. स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरीया, लेप्टोस्पायरोसिस सारख्या आजारांचे रुग्ण वाढत असल्याने मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात मुंबईत साथीच्या आजारांचा धोका वाढतो. त्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी स्वच्छ, निर्जंतुकीकरण आणि पाणी साठू न देण्याचे आवाहन पालिका
प्रशासनाकडून केले जाते. मात्र तरीही यावर्षी साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. यावर्षी आतापर्यंत 6 रुग्ण दगावले असल्याचीही माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली. त्यामधील दोन रूग्ण स्वाईन फ्लूचे, तर 4 डेंग्यू, मलेरियाचे आहेत

या वयोगटांतील नागरिकांचा झाला मृत्यू

19 जून : 08 वर्षांच्या मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू
07 जुलै : 38 वर्षीय व्यक्ती डेंग्यूमुळे दगावली
11 जुलै : स्वाईन फ्लूमध्ये 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
26 जुलै : 44 व्यक्तीचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू
4 जुलै : 34 वर्षीय व्यक्तीचा लेप्टोस्पायरोसिसमुळे मृत्यू
23 जुलै : 55 व्यक्तीचा मलेरीयामुळे मृत्यू

 

Back to top button