मुंबई : विनानिविदा 35 कोटींचे कंत्राट | पुढारी

मुंबई : विनानिविदा 35 कोटींचे कंत्राट

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  मालाड, मालवणी व जोगेश्वरी येथील नादावर पूल बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी मुंबई महापालिकेने विनानिविदा 35 कोटी रुपयांचे काम एका कंत्राटदाराला देण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे या कंत्राटात पालिका अधिकारी व कंत्राटरमध्ये साठेलोटे असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई शहर व उपनगरातील जीर्ण  झालेल्या पुलांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. 2019 मध्ये पश्चिम उपनगरातील नव्यांनी तीन पुल व दोन पादचारी पुल पाडून त्याठिकाणी पुनर्बांधणी करण्यासाठी सप्टेंबर 2019 मध्ये बुकॉन इंजिनिअर्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला कंत्राट देण्यात आले. त्यानुसार 31 कोटी 83 लाख रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने मंजूरी दिली होती. या कामाचा कंत्राट कालावधी 24 महिने इतका होता. हे काम 1 ऑक्टोबर 2019 पासून सुरु झाले. या पुलांपैंकी तीन वाहतूक पूल
आणि एका पादचारी पुलाचे काम पूर्ण झाले आहे. तर एका वाहतूक पुलाचे काम प्रगतीपथावर आहे.

ही कामे करणार्‍या ब्यूकॉन इंजिनिअरींग एँड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला मालवणीला जोडणार्‍या लगून रोड आणि महाकाली नाल्यावर मालाड रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी दोन वाहतूक पूल आणि जोगेश्वरी पूर्व येथील मजास नाल्यावर एक वाहतूक पूल बांधण्याचे काम देण्यात आले. सुमारे 35 कोटी 39 लाख 64 हजारांचे रुपयांचे कंत्राट विना निविदा देण्यात आले आहे.

मालाड मालवणी नाल्यावरील पूल

पुलाची लांबी :                             19.70 मीटर
पुलाची रुंदी :                              17.70 मीटर
पुलाचे बांधकाम व रस्त्याचे काम : आरसीसी पाईल्स व डांबरीकरण

मालाड पश्चिम महाकाली नाल्यावरील पूल

    पुलाची लांबी :                                     24.924मीटर
      पुलाची रुंदी :                                    18.30 मीटर
पुलाचे बांधकाम व रस्त्याचे काम :             आरसीसी पाईल्स व डांबरीकरण

जोगेश्वरी पूर्व मजास नाल्यावरील वाहतूक पूल

पुलाची लांबी :                                          16.85 मीटर
पुलाची रुंदी :                                            09.00 मीटर
पुलाचे बांधकाम व रस्त्याचे काम :              आरसीसी स्लॅब व डांबरीकरण

Back to top button