नुपूर शर्मा मनातलं नाही तर सत्य बोलत होत्या : राज ठाकरे | पुढारी

नुपूर शर्मा मनातलं नाही तर सत्य बोलत होत्या : राज ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : नुपूर शर्मा मनातलं नाही तर सत्य बोलत होत्या. त्यांचे समर्थन मी केलं. झाकीर नाईकने सुद्धा नुपूर शर्मा सारखचं वक्तव्य केलं आहे. मात्र झाकीर नाईकला कुणी माफी मागायला लावली नाही, असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. ते मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांच्या मेळाव्यात बोलत होते.

राज ठाकरे पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांना टोले लगावले. राज्यातील जनतेने शिवसेना-भाजप युतीला सत्ता दिली होती. पण जनतेची फसवणूक करत शिवसेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन महाविकास आघाडेचे सरकार स्थापन केले. महाराष्ट्रात राजकारणाचा खेळ खंडोबा सुरू आहे. हे राजकारण नाही तर तात्पुर्ती ॲडजस्टमेंट आहे. युपी, बिहार प्रमाणे राजकारण सुरू झाले आहे. कुणाला वाटेल तसे पक्ष बदलत आहेत. राजकारणातलं स्लो पॉयझनिंग संपणे गरजेचे आहे.

मनसेच्या आंदोलनांबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मनसे हा पक्ष आंदोलन अर्धवट सोडतो, अशी आमच्यावर टीका होते, पण मी विरोधकांनाच विचारतो मनसेने अर्धवट सोडलेलं एक आंदोलन दाखवा. मनसेने टोलचं आंदोलन यशस्वी केले. 65 ते 67 टोल आपण बंद केले. माझ्या हातात सत्ता द्या, राज्यातील सर्व टोलनाके बंद करतो, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी पक्षाचे पदाधिकारे, कार्यकर्त्यांना आपले काम जनतेपर्यंत पोहचवा असे आवाहन केले.

Back to top button