

मुंबई;पुढारी वृत्तसेवा: कोरोना महामारी लक्षात घेऊन, थकित जलदेयकांवर आकारण्यात आलेला अतिरिक्त आकार पालिकेने माफ केला आहे. या संधीचा तब्बल 1 लाख 43 हजार 139 जलजोडणी धारकांनी लाभ घेतला. थकीत जलआकारावर पालिका अतिरिक्त कर लावते. मात्र यंदा कोरोना महामारीमुळे अतिरिक्त कर रद्द करण्यात आला. हा कर रद्द करताना अभय योजनेची मुदत वेळोवेळी वाढवण्यात आली.
या वाढवलेल्या मुदतीत जलधारकांनी आपले थकीत बिल भरले. मात्र अतिरिक्त करापोटी महापालिकेला मिळणार्या 160 कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले. दरम्यान 160 कोटी रुपयांच्या मसुलावर पाणी सोडावे लागले असले तरी, जल आकारापोटी थकलेली दीड ते दोन हजार कोटी रुपयेची वसुली झाल्याचे पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून सांगण्यात आले.
उत्तर मुंबईतील पाणीपुरवठ्यात होणार सुधारणाकांदिवली, बोरिवली व दहीसर भागात पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी 80 ते 300 मिमी व्यासाच्या व काही भागात 450 व 900 मिमी व्यासाच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे उत्तर मुंबईतील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. त्याशिवाय गढूळ व दूषित पाणी या तक्रारी कमी होतील, असा विश्वास पालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे.