विधिमंडळ अधिवेशन लाईव्ह अपडेट : विरोधक आक्रमक; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी | पुढारी

विधिमंडळ अधिवेशन लाईव्ह अपडेट : विरोधक आक्रमक; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले आहेत. ओला दुष्काळ जाहीर करा, सर्वसामान्य जनतेला न्याय द्या, अशी मागणी विरोधकांनी केली. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधी पक्षांच्यावतीने ईडी सरकारला धारेवर धरण्यात आले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा, आले रे आले ५० खोके आले, खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो, स्थगिती सरकार हाय हाय, महाराष्ट्राशी गद्दारी सत्तेत आली शिंदेची स्वारी, आले रे आले गद्दार आले, अशा घोषणा देत विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

विधीमंडळ अधिवेशन

विधिमंडळ अधिवेशन लाईव्ह अपडेट

  • राष्ट्रपती अभिनंदनाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मांडला

द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी व जगदीप धनखड यांची भारताच्या उपराष्ट्रपती पदी निवड झाल्याबध्दल सभागृह अभिनंदन करत असल्याचे त्यांनी म्हटले. अतिशय विपरीत परिस्थितीत संघर्ष करणाऱ्या मुर्मू या आमच्या सगळ्यांसमोर एक आदर्श आहेत. त्यांचा जीवन संघर्ष आणि संकटांवर मात करण्याची त्यांची इच्छाशक्ती ही आज अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यावर त्या मुंबईला आल्या होत्या. तेव्हा मी त्यांना पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटलो. नंतर त्यांच्या शपथविधीला उपस्थित राहण्याची संधीही मिळाली. एखादी व्यक्ती इतकी डाऊन टू अर्थ असावी याचे खूप आश्चर्य वाटलं. त्या राष्ट्रपती होणार होत्या, पण कमालीची विनम्रता, आणि आपण ज्या समाजातून आलो आहोत, त्यांचं देणं असल्याची भावना त्यांच्यात असलेली पाहून मी भारावून गेलो. खरोखरच देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून त्यांचा कार्यकाळ अभिमानास्पद ठरेल असे ते म्हणाले.

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावही मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत मांडला. राजस्थानमधील झुनझुनु जिल्ह्यातील किठाना गावात शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या धनखड यांचे अभिनंदन केले. संसदीय कामकाजाचा मोठा अनुभव असलेल्या संसदपटूची भारताच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो, असे ते म्हणाले.

  • भंडारा गोंदिया जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाना पटोले आक्रमक
  • विधीमंडळात सामूहिक राष्ट्रगीत गायन; स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिम्मित्त संकल्पना

Back to top button