मुंबई: वाडिया हॉस्पिटलला आग; अग्निशमन दलाचे बंब दाखल | पुढारी

मुंबई: वाडिया हॉस्पिटलला आग; अग्निशमन दलाचे बंब दाखल

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : परळ, आचार्य दोंदे मार्गावरील वाडिया हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरील बंद असलेल्या ऑपरेशन थिएटरला शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळतात अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे प्रथम दर्शनी सांगण्यात येत आहे.

हॉस्पिटलमध्ये नियुक्ती करण्यात आलेल्या खासगी सुरक्षा रक्षकाने आगीच्या घटनेची माहिती मुंबई फायर ब्रिगेडला दिली. या आगीत सध्यातरी जीवितहानी झालेली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल प्रयत्नशील आहे. दरम्यान पोलीस व रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आगीमुळे हॉस्पिटलमध्ये सर्वत्र धूर पसरल्यामुळे रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान, अग्निशमन दलाने दोन नंबर वर्दीचा कॉल दिला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button