शिवसेना पक्षप्रमुख ‘त्या’ सर्व प्रश्नांची यादिवशी देणार; संजय राऊत यांचे सुचक वक्तव्य

शिवसेना पक्षप्रमुख ‘त्या’ सर्व प्रश्नांची यादिवशी देणार; संजय राऊत यांचे सुचक वक्तव्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेशी बंडखोरी करून फुटून जाणाऱ्या सदस्यांची संख्या वाढली. ज्यामुळे राजकारणात नावलौकीक असणाऱ्या या पक्षाला मोठी खिळ बसली. महाराष्ट्रातील या मोठ्या प्रादेशिक पक्षाला सध्याची परिस्थिती ही आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का आहे. या सर्व परिस्थितीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नव्हती. पण खासदार संजय राऊत यांनी पक्षप्रमुख ठाकरे याबाबतच्या सर्व परिस्थितीवर कधी बोलतील याविषयीचे सुचक वक्तव्य केलेलं आहे. सोशल मीडियावर एका ट्विटद्वारे त्यांनी ही माहिती दिली.

बंडखोरी केलेले आमदारांनी शिवसेनेवर टिका करत नाराजी व्यक्त करताना दिसून येत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील बलाढ्य स्थान असलेल्या या पक्षाला उतरती कळा लागल्याचे स्वरूप आले. शिवसेनेचे माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे दोघेच आतापर्यंत या सर्व परिस्थितीवर बोलत असल्याचे दिसून येत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील आता सर्व परिस्थितीवर येत्या २६ आणि २७ जुलै रोजी बोलणार आहेत. सध्या उपस्थित होत असलेल्या सर्व प्रश्नांवर ते सडेतोड उत्तरे देणार आहेत, अशा आशयाचे ट्विट राऊत यांनी केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली. शिवसेनेच्या कित्येक सदस्यांना सोबत घेऊन त्यांनी या सत्ता स्थापनेचं यश संपादन केलं. या सर्व घडामोडींदरम्यान शिवसेनेच्या मोठमोठ्या नेत्यांनी, आमदारांनी शिवसेनेतून फुटून जाण्याचं धोरण स्विकारलं. एकूणच या सर्व परिस्थितीतून शिवसेनेचं पक्षप्राबल्य कमी झालेलं पहायला मिळालं.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news