नाना, तुम्‍ही पण? चित्रा वाघ यांच्‍याकडून नाना पटोलेंचा व्‍हिडिओ ट्विट, राजकीय वुर्तळात खळबळ

नाना, तुम्‍ही पण? चित्रा वाघ यांच्‍याकडून नाना पटोलेंचा व्‍हिडिओ ट्विट, राजकीय वुर्तळात खळबळ

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नाना पटोले यांचा मेघालयातील चेरापुंजी येथील एक खासगी सहलीतील एक व्‍हिडीओ सोशल मीडियावर व्‍हायरल झाला आहे. तो भाजपच्‍या नेत्‍या चित्रा वाघ यांनी ट्विट केल्‍याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्‍पष्‍ट केली.

यासंदर्भात पत्रकार परिषदेत चित्रा वाघ म्‍हणाल्‍या की, नाना पटोले यांचा एक 'व्‍हिडीओ रोमान्‍स इन चेरापुंजी, मेघालया' हा आज सकाळपासून सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहे. राजकीय व सामाजिक जीवनात वावरत असताना नेत्‍यांनी भान ठेवणे गरजेचे आहे. लोक आम्‍हाला विचारतात की तुम्‍ही आता गप्‍प का, त्‍यामुळे मी ट्विट करत हा व्‍हिडीओ शेअर केला आहे. आणि नाना पटोले यांना सवाल केला आहे.

हेच ते पोले ओरचिड हॉटेल जेथे नानांचा ओक्‍के कार्यक्रम सुरु होता, असे लिहित या हॉटेलचे फोटोही या व्‍हिडिओमध्‍ये दाखविण्‍यात आले आहेत. संबंधित पीडितेने समोरे यावे आणि तिची तक्रार द्‍यावी, असे आवाहनही यावेळी चित्रा वाघ यांनी केले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news