Ramdas kadam: शरद पवारांचा शिवसेना फोडण्याचा कट; रामदास कदमांना अश्रू अनावर | पुढारी

Ramdas kadam: शरद पवारांचा शिवसेना फोडण्याचा कट; रामदास कदमांना अश्रू अनावर

पुढारी ऑनलाईन डेस्क: उद्धवजी अजून किती जणांची हकालपट्टी करणार? असा सवाल माजी मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. ज्यांच्यासाठी मी एवढं केले त्यांनीच माझी हाकालपट्टी करण्याचे ठरवले, पण माझी हाकालपट्टी करण्यापूर्वीच मी राजीनामा दिला. अशी खंत रामदास कदम यांनी व्यक्त करत पक्षप्रमुख उद्वव ठाकरेंवरील नाराजी दाखवली. गेल्या काही दिवसांमध्ये पक्षात घडलेल्या या घटनेच्या व्यथा सांगताना रामदास कदम यांना अश्रू अनावर झाले.

पुढे बोलताना रामदास कदम म्हणाले, शरद पवारांनी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला. पक्ष फोडण्याचे पुरावे देऊनही उद्धवजींनी दुर्लक्ष केले. पक्ष फुटला तरी चालेल, पण उद्धवजी पवारांसोबत राहिले. मविआमध्ये अडीच वर्षे तोंड दाबून बुक्यांचा मार आम्ही सर्व शिवसैनिकांनी सोसला. पाच वर्षे मविआचे सरकार चालले असते तर शिवसेना संपलीच असती. त्यामुळे शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचे मी आभार मानतो, असेही ते म्हणाले.

आजपर्यंत नारायण राणे, छगन भुजबळ, राज ठाकरे पक्षातून फुटले, तेव्हा मी तुमच्यासोबत राहून संघर्ष केला. 52 वर्षे काम करणाऱ्या एका शिवसैनिकांवरती राजीनामा देण्याची वेळ का येते याचं पक्षप्रमुखांनी आत्मपरिक्षण केलं पाहिजे, असे सांगत उद्धवजींनी आसपास असणाऱ्यांना हाकलून द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. मातोश्रीने डावल्यानंतर परत मातोश्रीवर गेलो नाही. पुष्कळ विचार केल्यानंतर शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  उद्धवजींनी मला शिवसेनेतून काढून टाकण्यापूर्वीच मी स्वत: राजीनामा देऊन तुम्हालाच माझ्या मनातून काढले, असे खदखद रामदास कदम यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली.

हेही वाचा:

 

Back to top button