

पुढारी ऑनलाईन डेस्क: मुंबईतील २६/११ हल्ल्यात पोलीस शिपाई अंबादास पवार शहीद झाले. त्यांच्या पत्नी कल्पना पवार यांची महाराष्ट्र सरकारने थेट पोलीस उपअधीक्षकपदी निवड केली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीय यांच्या हस्ते कल्पना पवार यांना नियुक्तीचे आदेश प्रदान करण्यात आले. या संदर्भातील वृत्त मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांच्या अधिकृत एक्स (X) सोशल मीडियावरून दिले आहे.
शहीद अंबादास पवार यांच्या पत्नी श्रीमती कल्पना पवार यांना नियुक्तीपत्र देऊन मुख्यमंत्री फडणवीस यांना शहीद पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी असलेली शासनाची कृतज्ञता आणि संवेदनशीलता पुन्हा एकदा प्रत्यक्ष कृतीतून दाखवल्याचे CMOने पोस्टमध्ये म्हटले आहे.
मुख्यमंत्री यांच्या या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना कल्पना पवार म्हणाल्या, “माझ्या पतीप्रमाणेच मलाही आता देशसेवेची संधी मिळाली आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, लाडक्या बहिणींचे आणि देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या शहीद वीरांचे आहे, हे माझ्या या नियुक्तीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.”