शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या आईचे वृद्धापकाळाने निधन | पुढारी

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या आईचे वृद्धापकाळाने निधन

घाटकोपर, पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अगदी जवळचे सहकारी असलेले आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या मातोश्री विद्या केशव नार्वेकर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. मंगळवार दि १२ रोजी रात्री त्यांनी लिलावती रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा मिलिंद, कन्या रुपाली चाफेकर, सून मीरा नार्वेकर असा परिवार आहे.

मिलिंद नार्वेकर यांच्या आईंच्या निधनाची वार्ता कळताच शिवसेनेसह विविध पक्षातील नेते मंडळींनी त्यांचे सांत्वन करण्यासाठी संपर्क साधला. तर विविध नेते मंडळींनी विद्या नार्वेकर यांना सोशल मीडियाच्या माध्यमांतून श्रद्धांजली वाहिली.

बुधवारी, दि १३ रोजी दुपारी ३ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत रेसिडेंन्सी डेक्कन, खार दांडा रोड, पाली हिल, वांद्रे पश्चिम येथील नार्वेकर कुटुंबियांच्या घरी त्यांचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. सांताक्रुज पश्चिम येथील स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

Back to top button