महत्त्वाच्या खात्यांसाठी भाजपमध्ये चढाओढ

महत्त्वाच्या खात्यांसाठी भाजपमध्ये चढाओढ
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्रिपद दिले असले, तरी महत्त्वाची खाती भाजपकडे राहणार आहेत. त्यामुळे महसूल, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम या 'क्रीम' खात्यांसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, राज्य रस्ते विकास, सामान्य प्रशासन ही खाती असतील; तर त्यांच्या गटाला उद्योग, परिवहन, पाणीपुरवठा, कृषी, उच्च व तंत्रशिक्षण, वने, पर्यावरण आदी खाती देण्यात येणार आहेत; पण मुख्यमंत्रिपद नसले तरी भाजपला 27 मंत्रिपदे मिळतील, असे सांगितले जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ आणि गृह खाते असेल. तर सर्वात 'क्रीम' असलेल्या महसूल या खात्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार या तीन नेत्यांमध्ये जोरदार चुरस आहे. महसूल खात्यासाठी चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्षपद सोडण्यास तयार झाले आहेत, असे सांगितले जाते. त्यांनी महसूल खात्यासाठी दिल्लीत फिल्डिंग लावली आहे. मागील फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे महसूल खाते होते.

दुसरीकडे, फडणवीस कट्टर समर्थक असलेल्या गिरीश महाजन यांचे नाव महसूल खात्यासाठी चर्चेत आहे. तसेच माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेही महसूल खात्यातील प्रयत्न सुरू आहेत. महसूलबरोबरच जलसंपदा खात्यासाठी भाजपमध्ये स्पर्धा आहे. तसेच हे खाते विश्‍वासू नेत्याकडे जाईल, असे बोलले जात आहे; कारण राष्ट्रवादीच्या नेत्यांची गैरव्यवहाराची प्रकरणे जलसंपदा खात्यात आहेत. मुंबईतून मंत्रिपदासाठी भाजपमध्ये आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्याबरोबर उत्तर भारतीय आणि गुजराती समाजाच्या आमदारांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news