मुंबईतील चौपाट्यांवर फेरफटका मारण्यास मनाई ! | पुढारी

मुंबईतील चौपाट्यांवर फेरफटका मारण्यास मनाई !

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: मुंबई महापालिकेने समुद्र चौपाटीवर फिरण्यास सर्वसामान्यांना मनाई केली आहे. हवामान खात्याच्या ऑरेंज आणि रेडअलर्टच्या काळात समुद्रकिनारे फक्त सकाळी 6 ते 10 या वेळेतच सर्वसामान्यांसाठी खुले राहतील, असे निर्देश पालिका आयुक्तांनी विभागीय सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

समुद्राला भरती असताना अनेक जण चौपाटीवर फेरफटका मारण्यासाठी जातात. यातील अनेक जण जाणून-बुजून समुद्रात उतरतात. समुद्रात पोहण्यासाठी जाऊ नये, असे आवाहन चौपाट्यांवर तैनात करण्यात आलेले लाईफ गार्ड पर्यटकांना करत असतात. त्यानंतरही अनेक जण अतिउत्साह दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात

बुडण्याच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. 14 जूनला जुहू येथे पाण्याचा अंदाज न आल्याने चार मुले बुडाली होती. यापैकी तीन मुलांचा मृत्यू झाला होता.त्यामुळेच चौपाटीवर फेरफटका मारण्यात निर्माण घालण्यात आले आहेत. या निर्बंधांची त्वरित माहिती पोलीस, अग्निशमन दल विभागाचे जीवरक्षक व समुद्रकिनार्‍याच्या देखभालीशी संबंधित कर्मचारी यांना देण्याचे निर्देशही पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत

Back to top button