मुंबई : हार्बर मार्गांवर दोन तासांचा ब्लॉक, सीएसएमटी ते वडाळा लोकल बंद | पुढारी

मुंबई : हार्बर मार्गांवर दोन तासांचा ब्लॉक, सीएसएमटी ते वडाळा लोकल बंद

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मस्जिद बंदर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या बाजूला असलेल्या खासगी ईमारतीच्या भिंतीचा काही भाग गुरुवारी सकाळी ७ वाजून १६ मिनिटांनी रेल्वे रुळाजवळ कोसळला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत मातीचा ढिगारा बाजूला केला. त्यामुळे खबरदारी म्हणून उरलेले धोकादायक बांधकाम पाडण्यासाठी मध्य रेल्वे आणि महापालिकेने तत्काळ दोन तासांचा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या काळात सीएसएमटी ते वडाळा दरम्यानची लोकल वाहतूक बंद राहणार आहे. प्रवासी या काळात दादर आणि कुर्ला मार्गे प्रवास करू शकतात. (Mumbai railway update)

Back to top button