मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात | पुढारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील दोन वाहने एकमेकांना धडकली. यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. हा अपघात मंगळवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई महापालिकेजवळ घडला. ताफ्यातील एक कार चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणारी कार कारला धडकली.

मुख्यमंत्री शिंदे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला अभिवादन करून पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतील आपत्कालीन कक्षाला भेट देण्यासाठी जात होते. यावेळी महापालिका मुख्यालयाजवळ त्यांच्या ताफ्यातील दोन कार एकमेकांना धडकल्या. ताफ्यातील एका कारने दुसऱ्या कारला मागून जोराची धडक दिली. पुढे असणाऱ्या कार चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणाऱ्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पुढील कारवर जाऊन धडकली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button