Mumbai Rain : मुंबईत संततधार; २५ ठिकाणी पाणी साचून वाहतूक ठप्प | पुढारी

Mumbai Rain : मुंबईत संततधार; २५ ठिकाणी पाणी साचून वाहतूक ठप्प

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबईत (Mumbai Rain) मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने जागोजागी पाणी साचले आहे. परिणामी, वाहतूक मंदावली असून काही ठिकाणी वाहतूक ठप्प झालीय. तसेच नीलम जंक्शन हा सकल भाग असल्याने अर्धा फूट उंचीपर्यंत याठिकाणी पाणी साचले आहे. वाहतूक अंमलदार याठिकाणी उपस्थित असून वाहतूक सुरळीत करून घेण्यात येत आहे. २५ ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पाणी साचल्याने बेस्टच्या बसेसची वाहतूक वळवण्यात आलीय. (Mumbai Rain)

मुंबईतील स्थिती पुढीलप्रमाणे-

– मानखुर्द रेल्वे पुलावर दक्षिणेकडे पाणी साचले, स्लीप रोड, वाहतूक मंदावली.

– दादर टीटी जंक्शन येथे पाणी साचले. मेन होल MCGM स्टाफने उघडले आहेत. मात्र या जंक्शनवरील वाहतूक व्यवस्थापित करण्यासाठी त्यांना वाहतूक पोलिसांची मदत हवी आहे.

– दादर टी टी सर्कलमध्ये पाणी साचल्याने वाहतूक गोखले रोडने वळवण्यात आली आहे.

– सी लिंक गेटवर पाणी साचले, दक्षिणेकडे, वाहतूक संथ झालीय, वरळी चौकी.

– हिंदमाता जंक्शनवर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली. भोईवाडा चौकी.

– सक्कर पंचायत, वडाळा येथे ०.५ फूट पाणी साचले, वाहतूक संथ. भोईवाडा चौकी.

– किंग सर्कल, माटुंगा येथे ०.५ फूट पाणी साचले, वाहतूक संथ. माटुंगा चौकी.

– मंचरजी जोशी चौक जंक्शनवर २.०० फूट पाणी साचले, वाहतूक मंदावली. माटुंगा चौकी

– कमानी जंक्शन कुर्ला येथे ०.५ फूट पाणी साचले, वाहतूक संथ. कुर्ला चौकी

– खार भुयारी मार्गावर पाणी साचले, वाहतूक मंदावली. वाकोला चौकी.

– मफतलाल जंक्शनवर वाहतूक संथ, दक्षिण बाँड.

– एव्हरर्ड नगर येथे वाहतूक संथ.

– खड्डे आणि BKC कनेक्टरमुळे वाहतूक संथ गतीने चालत आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा.

– चुनाभट्टी, असल्फा बस स्टॉप जंक्शनवर 2.00 फूट पाणी साचले आहे. येथे वाहतूक संथ आहे. घाटकोपर चौकी

– क्रिस्टल हाऊसवर पाणी साचले, पवई 1.0 फूट, वाहतूक संथ. पवई चौकी

Back to top button