मुंबई : पवई तलाव ओव्हरफ्लो | पुढारी

मुंबई : पवई तलाव ओव्हरफ्लो

मुंबई : पुढारी वृत्तसेवा मुंबई उपनगरातील पवई तलाव मंगळवारी, 5 जुलैला सायंकाळी 6.15 वाजता ओसंडून वाहू लागला. गेल्यावर्षी हा तलाव 12 जूनला दुपारी 3 वाजताच्या सुमारास वाहू लागला होता. यंदा हा तलाव सुमारे 23 दिवस उशिरा भरून वाहू लागला आहे. 545 कोटी लीटर पाणी साठवण्याची क्षमता असणार्‍या या तलावाचे पाणी हे पिण्यायोग्य नसल्याने औद्योगिक वापरासाठी वापरले जाते.

मुंबई शहरात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पवई तलाव झपाट्याने भरला. पश्चिम व पूर्व उपनगराच्या मध्यावर असलेला हा तलाव महापालिका मुख्यालयापासून 27 किलोमीटर दूर आहे. या तलावाचे बांधकाम 1890 मध्ये पूर्ण झाले. तलावाच्या बांधकामासाठी सुमारे 40 लाख रुपये एवढा खर्च आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र सुमारे 6.61 किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे 2.23 चौरस किलोमीटर एवढे असते. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये 545.5 कोटी लीटर पाणी असते. तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.

हेही वाचा

Back to top button