

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबईसारख्या शहरात भारतातील अनेक राज्यातून लोक शिक्षणासाठी, व्यवसायासाठी आणि इतर कारणांनी वास्तव्यासाठी येत असतात. मात्र मराठी भाषेच्या अपुर्या ज्ञानामुळे अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठीच मुंबई विद्यापीठामध्ये 1986 पासून अभाषिक मराठी विद्यार्थ्यांसाठी मराठी शिकण्यासाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे. मराठी भाषा विभागाने या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
इथल्या मातीशी, इथल्या भाषेशी आणि संस्कृतीशी आपले नाते अधिक घट्ट व्हावे हा या अभ्यासक्रम निर्मितीचा हेतू असल्याचे मराठी विभागाने म्हटले आहे. मराठी विभाग, रानडे भवन, पहिला मजला, विद्यानागरी, कलिना परिसर, सांताक्रूझ या केंद्रावर किंवा झरीीींंळाशर्लेीीीशीर्.ाी.रल.ळप या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. 22 जून ते 15 जुलै 2022 या कालावधीत प्रवेश घेता येतील. मुख्यतःअभ्यासक्रमकेंद्री उपक्रम राबवून भाषा आणि साहित्य विषयक जाणीव जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.
अभाषिकांसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रमम हा त्याच्याच एक भाग आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून विभागाने या अभ्यासक्रमात बदल केले आहेत. भाषिक कौशल्यांवर भर देऊन अभ्यासक्रमाची पुर्नरचना केली असल्याची माहिती मराठी विभाग प्रमुख डॉ. वंदना महाजन यांनी दिली.