Maharashtra floor test Live : शिंदे- फडणवीस सरकारचं बहुमत पास, १० काँग्रेस आमदार अनुपस्थित | पुढारी

Maharashtra floor test Live : शिंदे- फडणवीस सरकारचं बहुमत पास, १० काँग्रेस आमदार अनुपस्थित

मुंबई; पुढारी ऑनलाईन : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला. शिंदे- फडणवीस सरकारने आज विधानसभेत बहुमत सिद्ध केले. शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने १६४ आमदारांनी मतदान केले. तर विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात ९९ आमदारांनी मतदान केले. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजुने अधिक मतदान झाल्याने शिंदे सरकारने  विश्वासदर्शक ठराव जिंकल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केले. आमचे एकनाथराव शिंदे यांच्यावर प्रचंड मोठा विश्वास व्यक्त केला त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत म्हटले.

विधानसभा अध्यक्ष यांना मतदानाचा अधिकार नसला तरी सत्ताधारी पक्षाची १६४ ही संख्या कायम राहिली. काल विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत १०७ मते विरोधीपक्षाकडे होती. पण आज विश्वासदर्शक ठरावात विरोधीपक्षाची ८ मते कमी राहिली. आज विरोधी पक्ष ९९ वर थांबला. बहुमत चाचणीवेळी एकूण एकूण २२ आमदार अनुपस्थित राहिले. त्यात १० काँग्रेस आमदारांचा समावेश होता. आजदेखील सपानं तटस्थ भूमिका घेतली.

काँग्रेसचे पाच आमदार बहुमत चाचणीवेळी गैरहजर राहिले. तर बहुमत चाचणीआधी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर शिंदे गटात सामील झाले. तसेच आणखी एक आमदार श्यामसुंदर शिंदे देखील विश्वासदर्शक ठरावापूर्वीच एकनाथ शिंदे गटात सामील झाले.

रविवारी विधानसभा अध्यक्ष निवड झाल्यानंतर आज सोमवारी शिंदे- फडणवीस सरकारची (Shinde and Fadnavis led Maharashtra govt) विधानसभेत बहुमत चाचणी (Maharashtra floor test) झाली. काल झालेल्या विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत भाजपचे ॲड. राहुल नार्वेकर बहुमताने विजयी झाले. त्यांना १६४ मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात उभे असलेले राजन साळवी यांना १०७ मते मिळाली होती.

दरम्यान, एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी व्हीपचे उल्लंघन केल्याप्रकरणी पक्षाच्या १६ आमदारांच्या निलंबनासाठी विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी १६ आमदारांना निलंबनाची नोटीस बजावली जाईल, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष कार्यालयाकडून मिळाली.

Maharashtra floor test Live updates

एकनाथ शिंदे सरकारवरील विश्वासदर्शक ठराव बहुमताने मंजूर

सत्ताधारी गटाकडे १६४ मते..

कळमनुरीचे आमदार संतोष बांगर आज शिंदे गटात सहभागी..!

विधानसभा अध्यक्ष यांना मतदानाचा अधिकार नसला तरी सत्ताधारी पक्षाची १६४ ही संख्या कायम..

विश्वासदर्शक ठरावात विरोधीपक्षाची 8 मते कमी

काल विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत 107 मते विरोधीपक्षाकडे होती

आज विरोधी पक्ष 99 वर थांबला

१० काँग्रेस आमदार अनुपस्थित…

आज ही सपा आणि तटस्थ..!

काल तुम्ही सुट्टी मागत होता. आता आम्ही प्रचंड मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. आता विरोधी पक्षांच्या सदस्यांना सुट्टी मिळेल. असे सूचक विधान करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले.

सपाच्या अबू आझमींची तटस्थ भूमिका

शिंदे गटाला मिळाली १६४ मते

शिंदे -फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला

शिंदेशाहीवर विधानसभेत शिक्कामोर्तब

काँग्रेसचे ५ आमदार सभागृहाबाहेर

शिरगणती सुरू 

वडेट्टीवार, अशोक चव्हाण बहुमत चाचणीला मुकले, दोघेही उशीरा दाखल 

संतोष बांगर यांचे शिंदे गटाला मतदान

बहुमत चाचणी प्रक्रियेला सुरुवात 

विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात 

अनेक आमदार शेवटच्या मिनिटाला सभागृहात दाखल

सुधीर मुनगंटीवारांनी शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठराव मांडला. त्यावर आवाजी मतदान झाले. 

आमदार संतोष बांगर शिंदे गटात सामील, शिंदे गटातील आमदारांची संख्या ४०

ठाकरेंची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या व्हीपला शिवसेनेचा अधिकृत व्हीप म्हणून मान्यता देण्याच्या नवनियुक्त विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी ११ जुलै रोजी ठेवली आहे.

आज विधानसभेतील बहुमत चाचणीपूर्वी उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. आमदार संतोष बांगर आज शिंदे गटात सामील झाले. यामुळे शिंदे गटातील शिवसेना आमदारांचा आकडा ४० झाला आहे. संतोष बांगर हे हिंगोलीतील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

विधानभवनात राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरु

आमदारांच्या नाराजीमुळे राज्यात सत्तांतर – प्रवीण दरेकर

आम्हाला बहुमत मिळेल – प्रवीण दरेकर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हुतात्मा चौक येथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करणार आहेत. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील ( शिवाजी पार्क मधील) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत. चैत्यभुमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करतील.

संजय राऊत पत्रकार परिषद

मूळ पक्ष शिवसेना आहे. शिवसेनेच्या चिन्हावर तुम्ही निवडून आलात. तुम्ही फुटून बाहेर गेलात. फुटलेला गट मूळ शिवसेना कशी असू शकते? : संजय राऊत

हा पक्ष पुन्हा फोडण्याचा प्रयत्न होतो. त्यातूनही शिवसेना मजबूत होऊन उभी राहिली आहे : संजय राऊत

शिवसेना कागदावर कमजोर झाली असेल. जमिनीवर नाही : संजय राऊत

भाजपला केवळ शिवसेना फोडायची आहे. फुटीर नेत्याच्या गटाला मुख्यमंत्रीपद दिलं : संजय राऊत

महाराष्ट्राला मध्यावधी निवडणुकीला सामोरे जावे लागेल : संजय राऊत

Back to top button