आमदारांना विधान भवनात अतिरेक्यांप्रमाणे आणले : आदित्य ठाकरे यांची टीका | पुढारी

आमदारांना विधान भवनात अतिरेक्यांप्रमाणे आणले : आदित्य ठाकरे यांची टीका

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना विधान भवनात अतिरेक्यांप्रमाणे आणले, अशी टीका शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली. आजपासून विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू होत असून, पहिल्याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यापूर्वी आदित्य ठाकरे हे सकाळी विधानभवनात पोहोचले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी आदित्‍य ठाकरे म्हणाले, आमदारांना बनवलेला व्हीप कायदेशीर आहे, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना अतिरेक्यांसारखे आणले आहे. त्यांनी राज्यातील जनतेला आणि शिवसेनेला फसविले आहे. आरे कॉलनीत मेट्रो शेड बनविण्याचा नव्या सरकारचा निर्णय चुकीचा आहे. मुंबईकरांना फसवू नका, पर्यावरणाची जाेपासना करा, असेही आवाहनही त्‍यांनी केले.

हेही वाचलंत का? 

Back to top button