उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचाच व्हीप महत्त्वाचा, खासदार संजय राऊतांचा दावा

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचाच व्हीप महत्त्वाचा, खासदार संजय राऊतांचा दावा
Published on
Updated on

मुंबई : पुढारी ऑनलाईन : सध्या विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेना विधानमंडळाने सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे. पण हा व्हीप आम्हाला लागू होत नसून, आम्ही शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच पुढे वाटचाल करू असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दावा केला.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, बाळासाहेंबांचे नाव म्हणजे आग आहे. या आगीशी कोणीही खेळू नका, नाहीतर त्याची राख झाल्याशिवाय राहणार नाही. आज बाळासाहेबांच्या शिवसेनेला तुम्ही एवढे महत्त्व देत आहात, मग अडीच वर्षापूर्वी फडणवीसांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला का महत्त्व दिले नाही, असाही प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. शिवसेनेच्या पाठीत अनेकांनी वार केले. पण आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालीच शिवसेनेसाठी झोकून काम करू आणि ठाकरेंच्या नेतृत्वातच शिवसेना पुढे घेऊन जावू.

सध्याच्या सरकारवर बोलताना ते म्हणाले, हे सरकार कशाप्रकारे सत्तेत आले आहे, हे सर्व राज्यातील जनतेने पाहिल आहे. त्यामुळे राज्याची जनता या सरकारला स्विकारणार नाही, यांना जनताच उत्तर देईल. राज्य चालवण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा, असे म्हणत त्यांनी सत्ताधारी सरकारला शुभेच्छा देखील दिल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news