पक्ष वाचवण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न | पुढारी

पक्ष वाचवण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  शिवसेनेच्या सर्व नगरसेवक, आमदार, खासदार आणि पदाधिकार्‍यांना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना पाठिंबा असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पदाधिकार्‍यांकडून निष्ठेचे प्रतिज्ञापत्र घेऊन पक्षावर आपली कमांड असल्याचे दाखवण्याचा हा शिवसेनेचा प्रयत्न आहे.

‘आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर माझा विश्‍वास असून, त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रति मी पूर्ण निष्ठा व्यक्‍त करीत आहे’, अशा मजकुराचे हे प्रतिज्ञापत्र असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रतिज्ञापत्राखाली स्वत:ची सही आणि कंसात शिवसेनेतील पद याचा उल्लेख करण्यास सांगण्यात आला आहे.

Back to top button