विधानसभा अध्यक्षपदासाठीभाजपकडून राहुल नार्वेकर

विधानसभा अध्यक्षपदासाठीभाजपकडून राहुल नार्वेकर
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपने मुंबईतील कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली. नार्वेकर यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व आमदार गिरीश महाजन उपस्थित होते.

अध्यक्षपदासाठी सध्या त्यांचा एकमेव अर्ज आला आहे. महाविकास आघाडीने अद्याप कोणाचीही उमेदवारी जाहीर केलेली नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जानेवारी 2021 मध्ये अध्यक्षपद सोडले होते. तेव्हापासून हे पद रिक्‍तच होते. अर्ज भरण्याची मुदत शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत आहे. महाविकास आघाडी सरकारने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्‍त मतदानाने न होता खुल्या पद्धतीने व्हावी, असा नियमात बदल केला होता. मात्र, तो लागू झालेला नाही.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नियम समिती नेमण्यात आली होती. या समितीत भाजपचे सुधीर गाडगीळ व जयकुमार गोरे, शिवसेनेचे दीपक केसरकर आदी सर्वपक्षीय सात सदस्य होते. समितीने आपला अहवाल जुलै 2021 मध्ये सादर केला होता. मात्र, 'मविआ'ला त्या बदललेल्या नियमाखाली निवडणूक घेता आली नाही. आधी हा नियमबदल घटनेला अनुकूल नाही, अशी हरकत घेतली गेली. नंतर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. गिरीश महाजन यांची ही याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर राज्यपालांच्या मान्यतेसाठी हा विषय थांबला होता.

विधानसभेचे विशेष अधिवेशन रविवारी आणि सोमवारी होणार आहे. रविवारी 11 वाजता कामकाजाला सुरुवात होईल. त्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक होईल. आवाजी मतदानाने तसेच नियमानुसार उभे राहून मतविभागणी केली जाईल. ज्या उमेदवाराचा प्रस्ताव बहुमताने मंजूर होईल, ते अध्यक्ष नियुक्‍त होतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news