शासन निर्णयांचा तीन दिवसांतील खुलासा करा | पुढारी

शासन निर्णयांचा तीन दिवसांतील खुलासा करा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  शिवसेनेत बंड झाल्यानंतर तीन दिवसांत राज्य सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना नोटीस बजावली असून याबाबत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

17 जून ते 27 जून 2022 या काळात 32 विभागांकडून एकूण 443 जीआर काढण्यात आले. सर्वाधिक 152 जीआर हे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून तर मृद व जलसंधारण विभागाचे 32, शालेय व क्रीडा विभागाचे 27, महसूल व वन विभागाचे 23, सार्वजनिक आरोग्य विभागाचे 22, जलसंपदा विभागाचे 20, सार्वजनिक बांधकाम विभागाचे 19, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे 17 जीआर निघाल्याची माहिती विरोधी पक्षनेते दरेकर यांनी कागदपत्रांसह सादर केली. सरकार जाण्याच्या भीतीने घाईघाईत हे निर्णय जारी केले असल्याबाबत विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांना 24 जून रोजी तक्रार केली होती.दरेकर यांच्या या तक्रारीची दखल घेऊन राज्यपालांनी मुख्य सचिवांकडून खुलासा मागितला.

नर्णयांच्या चौकशीची
दरेकर यांची मागणी
160 पेक्षा अधिक

निर्णय 3 दिवसांत
शिवसेनेतील बंडखोरीमुळे सरकार पडणार या शक्यतेमुळे अनेक मंत्री धडाधड निर्णय घ्यायला लागले आहेत. काही निर्णय हे आर्थिक देवाण-घेवाणीतून होत असल्याचाही संशय विरोधकांना आहे.

Back to top button