रेल्वेत नोकरीच्या आमिषाने दोन तरुणींसह चौघांना गंडा | पुढारी

रेल्वेत नोकरीच्या आमिषाने दोन तरुणींसह चौघांना गंडा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :   रेल्वेत नोकरीच्या आमिषाने दोन तरुणींसह चौघांना गंडा घालणार्‍या हेमांगी राजेंद्र तोडवळकर या महिलेविरुद्ध कांदिवली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरु असून हेमांगीने अनेकांना नोकरीच्या नावाने गंडा घातल्याचे बोलले जाते.

वडील राजेंद्र वसंत तोंडवळकर हे मुंबई पोलीस दलात कामाला असल्याचे सांगितले. तिचा रत्नागिरी येथे राहणारा मित्र सुमीत सुरेश आदवडे हा रेल्वेमध्ये मोटरमन असून त्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी चांगले संबंध असल्याचे सांगून हा उद्योग सुरू केला. तक्रारदार तरुण कांदिवलीतील चारकोप परिसरात त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. आठ वर्षांपूर्वी एकाच ठिकाणी काम करताना त्याची हेमांगीशी ओळख झाली होती.

जून 2019 पासून हेमांगी तोंडवळकरने रेल्वेमध्ये नोकरीच्या आमिषाने तक्रारदारासह त्याच्या बहिण आणि इतर एक व्यक्तीकडून साडेसहा लाख रुपये घेतले. मात्र नोकरी न देता या चौघांची फसवणूक केली होती. त्यामुळे तिच्याकडे पैशांची मागणी सुरु केली. यावेळी तिच्या वडिलांनी हेमांगीला पैशांसाठी फोन करु नकोस. निवृत्तीनंतर त्यांचे पैसे परत करणार असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी पैसेही परत केले नाही. त्यामुळे त्यांनी कांदिवली पोलिसांत हेमांगीविरुद्ध तक्रार केली होती.

Back to top button