बंडखोर आमदारांनी डोळ्यात डोळे घालून बोलावे : आदित्य ठाकरे | पुढारी

बंडखोर आमदारांनी डोळ्यात डोळे घालून बोलावे : आदित्य ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या लढाईत आमचा विजय निश्चित आहे. कारण बंडखोरांचा कधीही विजय होत नसतो. जे पळून गेलेत, त्यांचे काय आव्हान असणार? असा सवाल राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना आज (दि.२७) केला.

ते पुढे म्हणाले की, राज्यात आता राजकारण सुरू नाही, तर सर्कशीचा खेळ सुरू आहे. बंडखोर आमदारांनी डोळ्यात डोळे घालून बोलावे. बहुमत चाचणीसाठी आम्ही तयार आहेत. पण बंडखोर आमदार तयार आहेत का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. राजकीय निकाल येत असतात. जनतेची कामे महत्त्वाची आहेत, असेही ते म्हणाले.

जे इथून पळून गेले आणि स्वतःला बंडखोर म्हणवून घेत आहेत, त्यांना बंड करायचे असेल तर त्यांनी इथे करायला हवे होते. त्यांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवायला हवी होती. बहुमत चाचणी होईल, जेव्हा ते माझ्यासमोर बसतील, माझ्या डोळ्यात बघतील आणि सांगतील आम्ही काय चूक केली, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button