एकनाथ शिंदे यांचे पोस्‍टर भाजप युवा मोर्चा ग्रुपवर व्हायरल | पुढारी

एकनाथ शिंदे यांचे पोस्‍टर भाजप युवा मोर्चा ग्रुपवर व्हायरल

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा; माहिमच्या नगरसेविका भाजप मुंबई महिला मोर्चाच्या अध्यक्षा शीतल गंभीर देसाई यांनी जाहीररीत्या शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांचे हार्दिक अभिनंदन असा पोस्टर असलेला फोटो त्याच्या समाज माध्यमावर टाकला आहे. या पोस्टरची सर्वत्र चर्चा होत असून, डोंबिवली भाजप युवा मोर्चा या व्हॉटस्अप ग्रूपवर देखील ही पोस्ट वायरल होत आहे.

या पोस्‍टवर शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः कमेंट्सचा पाऊस पाडला. मात्र त्यानंतर ही पोस्ट त्यांनी डिलीट केली असून सध्या त्यांच्या समाज माध्यमावर ही पोस्ट दिसून येत नाही. दरम्यान या ग्रुपवर बाळासाहेबांचे निकटवर्ती असलेल्या शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गंभीर यांच्या सुकन्या देखील आहेत. ही पोस्ट ट्विटरवर देखील व्हायरल होत असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

राज्‍यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशा परिस्‍थितीत या घडामोंडींचा अंदाज घेत असतानाच अशाप्रकारचे पोस्टर समोर आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्याचे दिसत आहे.

हे ही वाचालंत का? 

Back to top button