हम हार माननेवाले नहीं म्हणत संजय राऊत यांचे एकनाथ शिंदेंना आव्हान | पुढारी

हम हार माननेवाले नहीं म्हणत संजय राऊत यांचे एकनाथ शिंदेंना आव्हान

मुंबई : पुढारी ऑनलाईन : आता आमची वेळ आहे, शिंदे गटाची वेळ निघून गेली. रस्त्यावरची आम्ही ही लढाई जिंकू, असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांना आव्हान दिले. विधानभवनात बहुमत सिध्द करू. पुढची अडीच वर्ष सरकार पूर्ण करेल आणि निवडून येणार. आम्ही हार मानणार नाही, असे म्हणत राऊत यांनी महाविकास आघाडीकडून बंडखोरांना आव्हान दिले आहे. महाविकास आघाडी सरकार मजबूत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या एकनाथ शिंदेंच्या मागणीच्या विचार करु. शिंदे गटातील आमदारांनी २४ तासांत परत यावे, असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल केले होते. संजय राऊत यांच्या वक्तव्याने राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात मोठा भूकंप झाला. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारावर संकट कोसळले आहे. या पेच प्रसंगावर मार्ग काढण्यासाठी शिवसेनेचा खटाटोप सुरू आहे. शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी आज (दि.२३) पत्रकार परिषदेत राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती दिली.

राऊत म्हणाले होते की, शिवसेनेच्या आमदारांना गुलाम बनविण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरू आहे. राज्यातील राजकीय पेच प्रसंगावार लवकरच मार्ग निघेल. लवकरच मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानावर परतील, असा विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. शिंदे गटातील २१ आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे सांगून बहुमत सिद्ध करण्याएवढा आकडा आमच्याकडे असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

Back to top button