‘वर्षा’वरील बैठकीत शिवसेनेच्या आमदारांनी दिला मोठा सल्ला, म्हणाले.. | पुढारी

'वर्षा'वरील बैठकीत शिवसेनेच्या आमदारांनी दिला मोठा सल्ला, म्हणाले..

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर पक्षासोबत किती आमदार आहेत याची चाचपणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर आमदारांची बैठक घेतली. या बैठकीला शिवसेनेचे फक्त १८ आमदार उपस्थित होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे ३७ आमदार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, शिवसेनेकडून काही आमदार आपल्या मतदारसंघात गेल्यामुळे त्यांना यायला विलंब झाल्याचे सांगण्यात आले.

विधानपरिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांना घेऊन गुजरात गाठल्यानंतर शिवसेनेमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्या या धक्‍क्‍याने महाविकास आघाडीचे सरकारही धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार गेले आहेत याची चाचपणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षावर बैठक घेतली.

या बैठकीला अठराच आमदार हजर होते. या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी हे शिवसेनेवर आलेले संकट असून तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहात. या प्रसंगात खचून जाऊ नका. सरकार पडणार नाही, नाराज आमदारांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते यशस्वी होतील, असा विश्वास या आमदारांना दिला. तसेच आता राज्यात राहिलेल्या आमदारांना शिवसैनिकांच्या सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

Back to top button