शिवसेनेत बंडखोरी! नॉटरिचेबल एकनाथ शिंदे शिवसेनेच्या १५ आमदारांसह सुरतमध्ये | पुढारी

शिवसेनेत बंडखोरी! नॉटरिचेबल एकनाथ शिंदे शिवसेनेच्या १५ आमदारांसह सुरतमध्ये

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; मंत्री एकनाथ शिंदे हे नॉटरिचेबल असल्याची चर्चा होती. मात्र त्यांनी बंडखोरी केल्याचे आता स्पष्ट झाले असून, ते आपल्या समर्थक आमदारांसह सुरतमधील ली मेरिडियन हॉटेलमध्ये आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे सुमारे पंधरा आमदार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप होऊ शकतो.

ली मेरिडियन हॉटेलच्या बाहेर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सुरत हा भाजपचा गड मानला जातो. या गडामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांना ठेवण्यात आले आहे. दरम्यान, ठाण्यातील त्यांचे समर्थक हे एकनाथ शिंदे राज्यभर मेहनत घेत असताना त्यांना आधी उपमुख्यमंत्री आणि नंतर मुख्यमंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आले. सरकारमध्येही त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होत होता, त्यामुळे ते नाराज होते अस सांगितले जात आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी आम्हाला भाजपमध्ये जाण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना केल्या होत्या, असे दबक्या आवाजात सांगत आहेत.

हे ही वाचलंत का? 

Back to top button