MLC Election : एकनाथ खडसेंचा विजय, देवेंद्र फडणवीसांना चेकमेट! | पुढारी

MLC Election : एकनाथ खडसेंचा विजय, देवेंद्र फडणवीसांना चेकमेट!

मुंबई; पुढारी ऑनलाईन : अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. मतमोजणीच्या पहिल्या फेरीतच महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर तर शिवसेनेचे सचिन अहिर, आमश्या पाडवी हे विजयी झाले आहेत. तर भाजपचे उमा खापरे, प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, प्रसाद लाड यांचा विजय झाला आहे. तर काँग्रेसच्या भाई जगताप यांचा विजय झाला पण चंद्रकांत हंडोर यांचा पराभव झाला आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीचा पुन्हा धुव्वा उडवला आहे. राज्यसभा निवडणुकीपेक्षा आणखी दहा मते जास्त मिळवून भाजपच्या पाचही उमेदवारांनी बेगमी केली. भाजपचे 113 आमदारांचे संख्याबळ असताना 133 मते मिळवून महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मते आपल्याकडे वळवली आहेत.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेनंतर विधान परिषदेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीला आपल्या रणनितीने चेकमेट दिला आहे. अटीतटीच्या लढतीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालानंतर महाविकास आघाडीत पुन्हा मोठी अस्वस्था निर्माण झाली आहे. दरम्यान, काँग्रेसची दोन मतं फुटली असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. याचाच फायदा भाजपला झाल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीला हा एक मोठा झटका मानला जात आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले आहेत.

विधान परिषद निवडणूक : विजयी उमेदवार, कोणाला किती मतं?

शिवसेना

सचिन अहिर – २६
आमश्या पाडवी – २६

भाजप

राम शिंदे – २६
श्रीकांत भारतीय – २६
प्रवीण दरेकर – २६
उमा खापरे – २६

प्रसाद लाड विजयी…

राष्ट्रवादी काँग्रेस

एकनाथ खडसे – २७
रामराजे नाईक निंबाळकर -२६

काँग्रेस

भाई जगताप विजयी

चंद्रकांत हंडोरे पराभूत

Back to top button