एसी लोकलच्या फेर्‍या वाढल्या | पुढारी

एसी लोकलच्या फेर्‍या वाढल्या

मुंबई , पुढारी वृत्‍तसेवा :  पश्चिम रेल्वेवर आज, सोमवारपासून एसी लोकलच्या आठ फेर्‍या वाढविण्यात आल्या आहेत. या
वाढीव फेर्‍या सोमवार ते शुक्रवारदरम्यान धावणार आहेत, तर शनिवार आणि रविवारी एसी लोकलच्या
32, तर साध्या लोकलच्या आठ फेर्‍या धावणार आहेत.

चर्चगेटच्या दिशेने विरार ते चर्चगेट, विरार ते दादर, वसई ते चर्चगेट आणि मालाड ते चर्चगेटदरम्यान प्रत्येकी एक, तर विरारच्या दिशेने दादर ते विरार, चर्चगेट ते विरार, चर्चगेट ते वसई आणि चर्चगेट ते मालाडदरम्यान एक फेरी चालविण्यात येणार आहे.

 

Back to top button