काँग्रेसला भीती राष्ट्रवादीच्या जादा मतांच्या बेगमीची | पुढारी

काँग्रेसला भीती राष्ट्रवादीच्या जादा मतांच्या बेगमीची

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसला आपले दोन्ही उमेदवार विजयी करण्यासाठी आठ मतांची आवश्यकता असताना दगाफटका टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कोट्यापेक्षा जादा मतांची बेगमी करण्याची शक्यता असल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी मतदानाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मतांच्या गोळाबेरजेवर चर्चा केली.

माजी मंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयाने मतदानाची परवानगी नाकारल्यामुळे राष्ट्रवादीला अतिरिक्त एका मताची गरज आहे. मात्र राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांना दगाफटका नको म्हणून जादा मतांची जुळवाजुळव करण्याची तयारी केली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या उमेदवारांना 26 पेक्षा जादा मतांचा कोटा देणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे सावध झालेल्या काँग्रेस नेत्यांनी अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण तसेच भाई जगताप यांनी घेतल्या भेटीत कोणत्या छोट्या पक्षांची आणि पक्षांची मते राष्ट्रवादीला मिळतील याचा अंदाज घेतला. मात्र या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी अजित पवारांसोबतची बैठक मतांच्या नियोजनासाठी होती. अपक्ष आमदार आमच्यासोबत असून महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार विजयी होतील, असा विेशास व्यक्त केला. काँग्रेसला भीती राष्ट्रवादीच्या जादा मतांच्या बेगमीची मतांच्या कोट्यावर

मुनगंटीवार म्हणाले….

भाजपने विचारपूर्वकच राज्यसभेसाठी तीन उमेदवार उभे केले होते. आमदारांच्या सद्सद्विवेकबुद्धीच्या आधारावर आमचा तिसरा उमेदवार निवडून आला. आता विधान परिषद निवडणुकीतही आम्ही चमत्कार घडवू, असा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी केला.
आम्ह  पाचवा उमेदवार केवळ उभा केला नाही, तर त्याच्या विजयासाठी योग्य नियोजन केले आहे. त्यामुळे आम्हीच विजयी होऊ. ज्यांनी आमच्याशी विश्‍वासघात करून राज्यात सत्ता स्थापन केली, तेच लोक आमदारांनी विश्‍वासघात केला, अशी वक्‍तव्ये करीत आहेत, असा हल्ला मुनगंटीवार यांनी चढविला. शिवसेनेचे आमदार जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करणार नाही, असे म्हणत असतील तर त्यात त्यांचे काही चुकले नाही. जनतेने त्यांना काँग्रेस – राष्ट्रवादीच्या विरोधात निवडून दिले आहे. जे बाळासाहेबांचे विचार विसरले असतील तेच आघाडीच्या उमेदवाराला मतदान करतील, असे मुनगंटीवार म्हणाले.

विजय आपलाच होणार : देवेंद्र फडणवीस

विधान परिषदेची निवडणूक कठीण असली तरी ती अशक्य नाही. राज्यसभेप्रमाणे या निवडणुकीतही विजय आपलाच होणार, असा ठाम विेशास विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. भाजपने हॉटेल ताज प्रेसिडेन्सी येथे मुक्कामी असलेल्या आपल्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत आमदारांना कसे मतदान करायचे याचे मार्गदर्शन करण्यात आले. पाचपैकी कोण आमदार कोणत्या उमेदवारांना मतदान करणार, त्याचा पसंतीक्रम कसा असेल हेदेखील निश्चित करण्यात आले. या निवडणुकीत एक एक मत महत्त्वाचे आहे. मात्र भाजपचे पाचही उमेदवार विजयी करण्यासाठी आवश्यक असलेली मते आपल्याला मिळतील. तुम्ही फक्त सांगितल्याप्रमाणे मतदान करा, असे फडणवीस यांनी सांगितले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही विजयाचा प्रसाद उद्या प्रसाद लाड यांनाच मिळणार असे सांगत महाविकास आघाडीला पुन्हा एकदा पराभवाचा धक्का बसणार, असे सांगितले.  या निवडणुकीतही आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक मतदाना विधान परिषद निवडणुकीत भाजप पाच जागा लढत आहे. या निवडणुकीतही आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक मतदानाला येणार असल्याचे सांगण्यात आले.

भाजप पाच जागा

विधान परिषद निवडणुकीत भाजप पाच जागा लढत आहे. त्यामुळे काँग्रेसचे दुसरे उमेदवार भाई जगताप यांना जास्त धोका आहे तसाच धोका राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे यांनादेखील आहे.भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसे यांना विधान परिषदेवर निवडून आणून राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याच्या तयारीत आहे.

राष्ट्रवादीच्या या मोहिमेला धक्का देण्याची रणनीती भाजपा करू शकते, अशी भीती राष्ट्रवादीला आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस खडसे यांच्यासाठी अतिरिक्त मतांची जुळवाजुळव करीत आहे. त्यासाठीच खडसे यांनी मतदानापूर्वी बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्वा हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली  दरम्यान एमआयएमचे आमदार फारुख शाह यांनी आपण एकनाथ खडसे यांना पहिल्या पसंतीचे मत देणार असल्याचे जाहीर केले आहे. अशावेळी राष्ट्रवादीने जादा मते घेतली तर त्याचा धोका काँग्रेसला होऊ शकतो

Back to top button