मुंबईतील उत्तर भारतीयांना अग्निपथ आंदोलनाचा फटका | पुढारी

मुंबईतील उत्तर भारतीयांना अग्निपथ आंदोलनाचा फटका

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  सैन्यभरतीसाठी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेविरोधात पाचव्या दिवशीही उत्तर भारतात सुरू असलेल्या आंदोलनाचा फटका मुंबईत काम करणार्‍या उत्तर भारतीयांना बसला आहे. मुंबईतून उत्तर भारतात नियमित जाणार्‍या आणि येणार्‍या एलटीटी जयनगर एक्स्प्रेस, एलटीटी पटना एक्स्प्रेस, एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेससारख्या पाच रेल्वेगाड्या सलग तीन दिवस रद्द केल्या आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांत उन्हाळी सुट्टीत गेलेले नागरिक अडकून पडले आहेत.

या आंदोलनामुळे मुंबईकडे येणार्‍या आणि जाणार्‍या 12 रेल्वे रद्द केल्या. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून रेल्वेगाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत.रविवारी मुंबईवरून सुटणार्‍या 01027 एलटीटी-गोरखपूर विशेष एक्स्प्रेस, 12519 एलटीटी-कामाख्या एक्स्प्रेस, 12336 एलटीटी – भागलपूर एक्स्प्रेस, 11061 एलटीटी-जयनगर एक्स्प्रेस आणि 13202 एलटीटी-पटना एक्स्प्रेस रद्द केल्या.

तसेच पश्चिम रेल्वेवरील बांद्रा टर्मिनस-सह आरपीएफच्या सुट्ट्या रद्द रेल्वेच्या गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीच्या आधारे केंद्र सरकारने देशभरातील रेल्वे सुरक्षा दलाला(आरपीएफ) दक्ष राहण्याच्या सूचना केल्य  आहेत. यासाठी आरपीएफ अधिकारी-कर्मचार्‍यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत.

मुंबईतील  रेल्वे स्थानकांवर जास्तीत जास्त संख्येने आरपीएफ कर्मचार्‍यांनी उपस्थित राहावे, आवश्यकता भासल्यास रेल्वे पोलिसांशी समन्वय साधावा, गर्दीच्या; तसेच संवेदनशील रेल्वे स्थानकांवर चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Back to top button