शिवसेनेचा वर्धापन दिन आज आमदारांसोबत हॉटेलमध्येच!

 उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

पंचतारांकित नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या आमदारांच्या समोर भाषण करून शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी शिवसेनेचा 56वा वर्धापन दिन साजरा करणार आहेत.

शिवसेनेने पवई येथील वेस्ट इन या हॉटेलमध्ये आपल्या आमदारांची मुक्कामाची व्यवस्था केली असून, शिवसेना पुरस्कृत अपक्ष आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे स्वत: या हॉटेलवर मुक्कामाला आहेत. राज्यसभेच्या वेळी शिवसेनेचे सुहास कांदे यांचे मत बाद झाले होते. अशी चूक टाळण्यासाठी शिवसेनेने हॉटेलमध्ये आमदारांना डमी मतपेटी आणून मतदानाचे प्रात्यक्षिक दाखविले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रविवारी दुपारी आमदारांना मार्गदर्शन करतील. शिवसेनेचा रविवारी वर्धापन दिन असून तो साजरा करण्यासाठी वेगळा कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री आमदारांसमोर बोलतील आणि तेच भाषण राज्यभरातील शिवसैनिकांनाऑनलाईन ऐकवले जाईल. मुख्यमंत्री शिवसेना समर्थक अपक्ष आमदारांचीही भेट घेणार आहेत. काँग्रेसचे आमदार वरळीच्या फोर सिझन या पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत. यावेळी काँग्रसने विधान परिषदेसाठी दिल्लीवरून प्रभारी पाठवलेला नाही. दोन्ही उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी वरिष्ठ मंत्र्यांवर टाकली आहे. शनिवारी रात्री काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या आमदारांची बैठक घेतली. आमदारांच्या कामांबाबत निवडणुकीनंतर बैठक घेतली जाईल, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news