

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजाराला आज पुन्हा एकदा मोठ्या घसरणीचा सामना करावा लागला. आज सोमवारी (१३ जून) बाजार खुला होताच सेन्सेक्समध्ये (Sensex) तब्बल १५०० अंकांची घसरण नोंदवली गेली. तर निफ्टी ४०० अंकांनी कोसळला. परिणामी गुंतवणूकदारांचे जवळपास सहा लाख कोंटीचे नुकसान झाले.
अमेरिकेतील वाढत्या चलनवाढीमुळे फेडरल रिझव्र्हकडून व्याजदरात मोठी वाढ केली जाणार आहे. या चिंतेने जगभरातील भांडवली बाजारात मोठी घसरण झाली. याचा परिणाम देशांतर्गत भांडवली बाजारावर झाला. दरम्यान आज दिवसअखेर सेन्सेक्समध्ये (Sensex) १४५७ अंकांनी घसरण नोंदवली गेली. तर निफ्टीचा निर्देशांक ४२७ ने घसरून १५,८०० च्या खाली बंद झाला.
डॉलरच्या तुलनेत रुपयात आज सोमवारी प्रचंड अवमूल्यन झाले. आज सोमवारी रुपया ७८ वर खुला झाला. शुक्रवारी रुपया १९ पैशांनी घसरला होता आणि तो ७७.९३ रुपये इतका खाली आला होता.
आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात खराब झाली आणि दोन्ही निर्देशांक मोठ्या घसरणीसह ओपन झाले. जसजसा दिवस पुढे सरकत गेला तसतशी ही घसरण वाढत गेली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 1457 अंकांनी घसरून 52,847 वर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 427 अंकांनी घसरून 15,774 वर बंद झाला.
तत्पूर्वी, बीएसई सेन्सेक्स 1200 अंकांच्या घसरणीने ओपन झाला. तर एनएसई निफ्टी निर्देशांकाने 16,000 च्या खाली व्यवहार सुरू केला. दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्सची 1700 अंकांनी घसरण झाली. सोमवारी झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सहा लाख कोटींहून अधिक रुपये एकाच झटक्यात बुडाले. तत्पूर्वी, शुक्रवारी, गेल्या आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, शेअर बाजार घसरणीसह उघडला आणि अखेरीस लाल चिन्हावर मोठ्या घसरणीसह बंद झाला. BSE सेन्सेक्स 1017 अंकांनी घसरून 54,303 वर बंद झाला होता, तर निफ्टी 276 अंकांच्या घसरणीसह 16,202 वर बंद झाला होता.
मे महिन्यात अमेरिकेतील वाढत्या महागाईचा प्रभाव पुन्हा एकदा अमेरिकन शेअर बाजारांबरोबरच भारतीय बाजारावरही वाढला आहे. डिसेंबर 1981 पासून येथील महागाई सर्वाधिक वेगाने वाढली आहे. महागाई दरातील या वाढीमुळे फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात पुन्हा वाढ होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. याचा परिणाम गुंतवणुकीवर झाला आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपयात आज सोमवारी प्रचंड अवमूल्यन झाले. आज सोमवारी रुपया ७८ वर खुला झाला. शुक्रवारी रुपया १९ पैशांनी घसरला होता आणि तो ७७.९३ रुपये इतका खाली आला होता.