Monsoon arrives : मान्सून केरळमध्‍ये आलाच नाही ‘स्कायमेट’चा दावा | पुढारी

Monsoon arrives : मान्सून केरळमध्‍ये आलाच नाही 'स्कायमेट'चा दावा

पुढारी ऑनलाईन डेस्क 

मान्‍सून केरळमध्‍ये दाखल झाला आहे,अशी घाेषणा भारतीय हवामान विभागाने रविवार, २९ मे राेजी केली हाेती.   मात्र हा दावा स्‍कायमेट या खासगी हवामान अंदाज देणार्‍या संस्‍थेने खाेडून काढला आहे. मान्‍सून दाखल झाल्‍याचे निकष पूर्ण हाेण्‍याआधीच हवामान विभागाने मान्‍सून आल्‍याची घाेषणा केल्‍याचे स्‍कायमेट या संस्‍थेने म्‍हटलं आहे. दरम्‍यान, स्‍कायमेटचा दावा भारतीय हवामान विभागाने फेटाळला आहे.  मान्सून केरळात दाखल झाला का,  याबाबतचा दाेन्‍ही संस्‍था वेगवेगळी माहिती देत असल्‍याने सर्वसामान्‍यांमध्‍ये संभ्रम निर्माण झाला आहे.

स्कायमेटने म्हटलं आहे की, भारतीय समुद्र किनारपट्टीला मान्सूनपूर्व दोन चक्रीवादळाचा धोका असूनही, आम्ही निर्धारित (1 जून) केलेल्या तारखेच्या दोन दिवस आधी म्हणजेच २९ मे राोजी मान्सूनने केरळमध्ये प्रवेश केल्‍याचा हवामान खात्याने केलेल्या दावा चुकीचा आहे.  मान्सून कोणतेच निकष पूर्ण करत नसतानाही घाईगडबडीने ही घाेषणा करण्‍यात आली आहे.

मान्सून येण्याच्या निकषात १४ हवामान केंद्रांपैकी ६० टक्के स्टेशन्समध्ये २.५ मीमी किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस सलग दोन दिवस नोंदवला गेला पाहिजे. मात्र, केरळातील १४ हवामान केंद्रांपैकी फक्त ७ हवामान केंद्रांमध्येच पाऊस झाला आहे. म्हणजे फक्त ५० टक्के ठिकाणीच पाऊस २.५ मीमी किंवा त्याहून अधिक ठिकाणी नोंदवला गेला आहे. त्यामुळे मान्‍सूनचे आगमन झाल्‍याचे निकष पूर्ण झालेले नाहीत. त्‍यामुळे मान्‍सून केरळमध्‍ये दाखल झाल्‍याचे भारतीय हवामान खात्याचा अंदाज चुकीचा असल्याचे स्कायमेटने म्हटलं आहे. दरम्‍यान, स्‍कायमेटने केलेला दावा भारतीय हवामान विभागाने फेटाळला आहे.

वातावरण जरी अनुकूल असले तरी, नैऋत्य मोसमी वाऱ्याचा वेग कमी असल्याने यामध्ये अडथळा निर्माण होत असून, १ जून पासून या वाऱ्याचा वेग वाढून ३ जूनला मान्सून केरळ मध्ये दाखल होईल असे, असा अंदाज हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र मान्‍सून केरळमध्‍ये तीन दिवस आधीच म्‍हणजे रविवार, २९ मे राेजी दाखल झाल्‍याची घाेषणा हवामान विभागाने केली हाेती.

हेही वाचा

Back to top button