राऊत कुटुंबीयांकडे १५ कोटींची मालमत्ता | पुढारी

राऊत कुटुंबीयांकडे १५ कोटींची मालमत्ता

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला असून तेव्हा सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात जंगम मालमत्ता 2 कोटी 21 लाख, तर स्थावर मालमत्ता 4 कोटी 6 लाख रुपये नमूद केली आहे. त्याची बाजार भाव किंमत 8 कोटी 21 लाख आहे. तर त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची जंगम 97 लाख आणि स्थावर मालमत्ता 4 कोटी 20 लाख आहे. त्याची बाजार भाव किंमत 7 कोटी 27 लाख आहे.

संजय राऊत यांनी 27 लाख 99 हजार 169 रुपये इतके 2020/21 या वर्षातील आर्थिक उत्पन्न दाखवले आहे, तर राऊत यांचे 2018/19 मध्ये 32 लाख, तर 2019/20 मध्ये 35 लाख इतके उत्पन्न दाखविले आहे.

वर्षा राऊत यांनी 2020/21 मध्ये 21 लाख 58 लाख 970 रुपये इतके उत्पन्न नमूद केले आहे. 2019/ 29 मध्ये त्यांचे उत्पन्न 17 लाख उत्पन्न होते, असे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे.

संजय राऊत यांनी त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांच्याकडून 64 लाख, लहान बंधू संदीप राऊत यांच्याकडून पाच लाख, मुलगी विधिता हिच्याकडून साडेतीन लाख आणि रॉयल पाल्म प्रा. लि यांच्याकडून 99 लाख 20 हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. 1 कोटी 71 लाख 70 हजार रुपयांचे त्यांच्यावर कर्ज आहे.

पत्नी वर्षा राऊत यांनी धनंजय लेंडे यांच्याकडून 10 लाख, संजय राऊत यांच्याकडून 46 लाख 44 हजार, पूर्वशी संजय राऊत हिच्याकडून 5 लाख 90 हजार, सुबोध राऊत यांच्याकडून 15 लाख, सुजित पाटकर 30 लाख, अवणी कन्स्ट्रक्शन 13 लाख 78 हजार, इतर 45 लाख असे 1कोटी 67 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. कोणत्याही बँकेचे राऊत यांनी कर्ज घेतलेले नाही.

संजय राऊत यांच्या बँकेत तसेच अन्य वित्तीय संस्थांमध्ये 1 कोटी 62 हजार रुपयांच्या ठेवी आहेत, तर त्यांच्या पत्नीच्या खात्यावर 39 लाख 58 हजार रुपये आहेत. त्यांच्या नावावर असेंट कंपनीची एक चारचाकी वाहन आहे. पत्नीकडे 39 लाखांचे दागिने आहेत, असे त्यांनी नमूद केले आहे.

संजय पवारांकडे १८ कोटींची शेतजमीन

राज्यसभेसाठीचे शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात 56 लाख 19 हजार रुपयांची जंगम मालमत्ता, तर 39 लाख 99 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे, तर पत्नीकडे 47 लाख 29 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे स्पष्ट केले आहे. सध्याच्या बाजारभावानुसार संजय पवार यांच्या मालमत्तेची किंमत 2 कोटी 72 लाख आहे. त्यांच्याकडे 18 कोटी रुपयांची कोल्हापूर येथे शेतजमीन आहे.

संजय पवार यांच्यावर 47 लाख 67 हजार रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्याकडे 12 लाख रुपयांचे दागिने, तर पत्नीकडे 33 लाख रुपयांचे दागिने आहेत. पवार यांनी नागाळा पार्क येथे कमर्शिअल जागा 35 लाख रुपयांना खरेदी केली आहे. त्याची सध्याची बाजारभाव किंमत 2 कोटी 44 लाख आहे. त्यांच्या बँक खात्यात 6 लाख 71 हजार रुपये असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे, तर त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात 8 लाख 23 हजार रुपयांच्या ठेवी आहेत.

Back to top button