CM ठाकरे live: लोकल, हॉटेलबाबत मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून मुभा

 उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

मुंबई, पुढारी ऑनलाईन : मुंबईत लोकल प्रवास १५ ऑगस्टपासून सुरू (CM ठाकरे live). मात्र, तो करताना ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत आणि १४ दिवस झाले आहेत. त्यांना मुभा देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM ठाकरे live) यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री आठ वाजता सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याबाबत भाष्य केले.

टास्क फोर्सच्या उद्या (ता. ९) बैठकीनंतर हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल आणि मंदिरे उघड्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, असेही ठाकरे म्हणाले.

टास्क फोर्सच्या उद्या (ता. ९) बैठकीनंतर हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल आणि मंदिरे उघड्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, असेही ठाकरे म्हणाले.
ठाकरे म्हणाले, प्रवासाला मुभा देण्यासाठी एक ॲप तयार केले आहे. यावर नोंदणी करायची. त्यांनी त्यांना प्रवासाची परवानगी दिली आहे. ज्यांच्याकडे मोबाईल नाही त्यांच्यासाठी ऑफलाईन पास घेण्याची सुविधा केली आहे.

कोरोनाचे संकट टळलेले नाही. त्यामुळे उद्या होणाऱ्या टास्क फोर्सच्या बैठकीनंतर हॉटेल, मॉल आणि अन्य व्यवसाय सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. सोमवारी टार्स फोर्सची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर निर्णय होईल.

कोविडमुळे अनेक सणांवर परिणाम झाला आहे. कोविडच्या दोन लाटा येऊन गेल्या. हा काळ आठवला तरी अंगावर काटा येतो. हा संसर्ग टाळायचा असेल तर आपण निर्बंध पाळायला हवेत.

राज्यात लसीकरणाचा वेग वाढला आहे. १५ लाखांपर्यंत लसीकरणाचे ध्येय आहे. जसा पुरवठा वाढत आहे तसा लसीकरणाचा वेग वाढेल.

राज्यात लॉकडाऊन करून गप्प बसलो नाही. तर उपाययोजनाही केल्या आहेत. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवली आहे. राज्यात ६०० पेक्षा जास्त कोरोना टेस्टिंग लॅब तयार केल्या आहेत.

पहिल्या लाटेनंतर अमरावती आणि परिसरात रुग्ण दिसत होते. कुटुंबं बाधित होती. तो कोविडचा व्हेरिएंट होता. डेल्टा विषाणूने प्रसार केला आहे.

डेल्टाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेत लॅब तयार केली आहे. या लॅबमध्ये राज्यातील व्हेरिएंटची तपासणी होणार आहे.

पूरबाधित जिल्ह्यांवर विशेष लक्ष

पूरबाधित जिल्ह्यांतील कोरोनाबाबत ते म्हणाले, पूर येऊन गेलेल्या सिंधूदुर्ग, रत्नागिरी सातारा, रायगडा, कोल्हापूर, सांगली येथे रुग्ण कमी होत नव्हते.

पूरग्रस्त भागात पाण्याच्या अनुषंगाने जे रोग येतात त्याबाबत प्रशासन लक्ष ठेवून आहे. पुणे, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधूदुर्ग, रत्नागिरी, बीड या जिल्ह्यांत आजही काळजी घेण्याची गरज आहे.

स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे. गेले वर्षभर ही यंत्रणा काम करतेय त्यामुळे ताण वाढतोय. आपण काही गोष्टी ठरवल्या पाहिजेत

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news