मुंबईत टोलमाफी ते नदीजोड योजनेला मंजूरी; महायुती सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत १९ मोठे निर्णय

Cabinet Meeting | उद्यापासून अचारसंहिता लागण्याची शक्यता
Maharashtra cabinet meeting
शिंदे सरकारचे शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतही १९ मोठे निर्णय file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईत हलक्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी, दमणगंगा-एकदरे-गोदावरी नदीजोड योजनेस मंजूरी, कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव यासह १९ मोठे निर्णय आज (दि. १४) राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आहेत. उद्यापासून अचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने शिंदे सरकारची ही शेवटची मंत्रिमडळ बैठक झाली.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

1. मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ १२ पासून अंमलबजावणी. (सार्वजनिक बांधकाम)

2. आगरी समाजासाठी महामंडळ (सामाजिक न्याय)

3. समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम (उच्च व तंत्रशिक्षण)

4. दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता (जलसंपदा)

5. आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता (जलसंपदा)

6. वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता (जलसंपदा विभाग)

7. राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित (महसूल)

8. पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी (महसूल)

9. खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य (महसूल)

10. राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार

11. पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता (नगर विकास)

12. किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ (सहकार)

13. अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ (सहकार)

14. मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे (वैद्यकीय शिक्षण)

15. खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (वैद्यकीय शिक्षण)

16. मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा (मराठी भाषा)

17. अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी अभ्यासगट

18. उमेदसाठी अभ्यासगट (ग्राम विकास)

19. कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव (कौशल्य विकास)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news